Home » शेअर बाजार » SBI चा पहिल्या तिमाहीत दमदार निकाल; नफा ₹21,121 कोटी, नेट इन्इंटरेस्ट इन्कम ( निव्वळ व्याज उत्पन्न) मध्ये 14% वाढ

SBI चा पहिल्या तिमाहीत दमदार निकाल; नफा ₹21,121 कोटी, नेट इन्इंटरेस्ट इन्कम ( निव्वळ व्याज उत्पन्न) मध्ये 14% वाढ

Sib q1 result
Facebook
Twitter
WhatsApp
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आर्थिक वर्ष 2026 ते 27 च्या पहिल्या तिमाहीत मजबूत आर्थिक कामगिरी नोंदवली आहे. बँकेचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 10.2 टक्क्यांनी वाढून ₹21,121 कोटींवर पोहोचला. निव्वळ व्याज उत्पन्न, व्याजातून मिळणारे उत्पन्न आणि ऑपरेटिंग नफा या सर्वच प्रमुख निर्देशांकांमध्ये चांगली वाढ झाल्याने बँकेची मुख्य व्यवसायातील कामगिरी अधिक मजबूत झाल्याचे दिसून आले.

स्टेट बँक ऑफ इंडियाने एप्रिल ते जून 2026 या तिमाहीचे स्वतंत्र आर्थिक निकाल जाहीर केले. या कालावधीत बँकेचा निव्वळ नफा ₹21,121 कोटी राहिला. मागील आर्थिक वर्षातील याच तिमाहीत हा नफा ₹19,160 कोटी होता. म्हणजेच वार्षिक आधारावर 10.2 टक्क्यांची वाढ झाली असून तिमाही आधारावरही नफ्यात सुमारे 7 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली.

बँकेच्या मुख्य व्यवसायातील उत्पन्नातही उल्लेखनीय वाढ झाली. निव्वळ व्याज उत्पन्न म्हणजेच Net Interest Income (NII) 14.9 टक्क्यांनी वाढून ₹46,992 कोटी झाले. मागील वर्षी याच कालावधीत ते ₹40,906 कोटींच्या आसपास होते. व्याज उत्पन्नातील वाढ आणि कर्जवाढीमुळे ही कामगिरी शक्य झाल्याचे निकालातून स्पष्ट होते.

ऑपरेटिंग नफ्यातही मजबूत वाढ

पहिल्या तिमाहीत एसबीआयचा ऑपरेटिंग नफा ₹33,529 कोटींवर पोहोचला. मागील वर्षीच्या ₹30,544 कोटींच्या तुलनेत हा 9.8 टक्क्यांनी अधिक आहे. निव्वळ व्याज उत्पन्नातील भक्कम वाढीमुळे ऑपरेटिंग नफ्यालाही चांगला आधार मिळाला.

तिमाहीदरम्यान बँकेचे एकूण व्याज उत्पन्न ₹1,27,896 कोटी झाले. मागील वर्षाच्या तुलनेत त्यात 8 टक्क्यांची, तर मागील तिमाहीच्या तुलनेत 4 टक्क्यांची वाढ झाली. दुसरीकडे व्याज खर्च ₹80,904 कोटी राहिला, जो वार्षिक आधारावर 5 टक्के आणि तिमाही आधारावर 3 टक्के वाढला.

तरतुदींमध्ये वाढ

तिमाहीदरम्यान बँकेने ₹5,047 कोटींच्या तरतुदी केल्या. मागील वर्षाच्या तुलनेत त्यात 6 टक्क्यांची वाढ झाली असून मागील तिमाहीच्या तुलनेत ही वाढ 76 टक्के आहे. तरीही मजबूत मुख्य व्यवसाय आणि व्याज उत्पन्नातील वाढीमुळे बँकेने नफा वाढ कायम ठेवला.

Gold and Silver price

टॉप स्टोरी

नक्की वाचा