स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर BSNL ने ग्राहकांसाठी एकाचवेळी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये 602 हून अधिक नवीन 4G BTS उभारण्याची तयारी, नव्या ग्राहकांसाठी 1 रुपयांची Freedom 2.0 ऑफर, 1111 रुपयांचा 200 Mbps फायबर प्लॅन आणि 2399 रुपयांच्या वार्षिक प्लॅनवर अतिरिक्त 47 दिवसांची वैधता अशा ऑफर्समुळे सरकारी टेलिकॉम कंपनीने खासगी कंपन्यांसमोर आक्रमक पाऊल टाकले आहे.
1 रुपयांची Freedom 2.0 ऑफर चर्चेत
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने BSNL ने नव्या ग्राहकांसाठी Re 1 Freedom 2.0 ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये दररोज 1 GB डेटा, दररोज 100 SMS आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंग मिळणार आहे. या सुविधांची वैधता 24 दिवसांची आहे.
मोबाइल ग्राहकांसाठी आणखी एक महत्त्वाची घोषणा म्हणजे 2,399 रुपयांच्या वार्षिक प्रीपेड प्लॅनवर अतिरिक्त 47 दिवसांची वैधता. त्यामुळे या प्लॅनची एकूण वैधता 412 दिवसांपर्यंत पोहोचणार आहे.
1111 रुपयांत 200 Mbps फायबर ब्रॉडबँड
ब्रॉडबँड ग्राहकांसाठीही BSNL ने आकर्षक योजना आणली आहे. Fibre Freedom या विशेष प्लॅनची सुरुवातीची किंमत 1,111 रुपये प्रति महिना ठेवण्यात आली आहे.
या प्लॅनमध्ये 200 Mbps पर्यंत इंटरनेट स्पीड आणि दर महिन्याला 5,000 GB डेटा मिळणार आहे. याशिवाय 25 हून अधिक प्रीमियम OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शनही या योजनेत समाविष्ट आहे.
This Independence Day, give yourself the freedom from frequent recharges.
— BSNL India (@BSNLCorporate) August 13, 2026
Get 412 days of BSNL connectivity with one recharge, including 47 extra days beyond a year.
Recharge smart via #BReX 👉 https://t.co/SpaVXw85OI#BSNLIndia #StayConnected #InternetForEveryone #DigitalLife… pic.twitter.com/qGtt7WkKxS
यामुळे घरातून काम करणारे ग्राहक, ऑनलाइन शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच मोठ्या प्रमाणावर इंटरनेट वापरणाऱ्या कुटुंबांसाठी हा प्लॅन महत्त्वाचा ठरू शकतो.
BSNL Selfcare App मध्ये मोठे बदल
ग्राहक सेवा अधिक डिजिटल करण्यासाठी BSNL ने Android आणि iOS साठी आपल्या Selfcare App ची सुधारित आवृत्ती आणली आहे.
या अॅपमधून ग्राहक प्रीपेड रिचार्ज, बिल पेमेंट, तक्रार नोंदणी आणि तिचा मागोवा घेणे, Do Not Disturb सेटिंग तसेच पेमेंट हिस्ट्री पाहू शकतात.
याशिवाय फायबर कनेक्शन बुक करण्याची सुविधा, AI chatbot, voice search, एकाच अॅपमधून अनेक खाती व्यवस्थापित करण्याची सुविधा आणि मनोरंजन सेवा यांचा समावेश करण्यात आला आहे.
मोफत मनोरंजन आणि सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीवरही भर
BSNL च्या ग्राहकांना Tango TV च्या माध्यमातून जवळपास 500 लाइव्ह टीव्ही चॅनेल पाहण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
पारंपरिक मोबाइल नेटवर्क पोहोचत नसलेल्या भागांसाठी BSNL ने Global Satellite Phone Service वरही भर दिला आहे. विशेषतः दुर्गम आणि भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक प्रदेशांमध्ये आवाजाची कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणे हा या सेवेचा उद्देश आहे.







