दुचाकी आणि तीन-चाकी वाहनांच्या जागतिक बाजारपेठेत आघाडीवर असलेल्या टीव्हीएस मोटर कंपनीने (TVSM) नेपाळच्या बाजारपेठेत त्यांची अत्यंत उत्सुकता ताणून धरलेली ‘टीव्हीएस ऑर्बिटर’ (TVS Orbiter) ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर २३ जुलै २०२६ रोजी काठमांडू येथे अधिकृतपणे लाँच केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शाश्वत इलेक्ट्रिक मोबिलिटीचा विस्तार करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले असून, दररोजच्या शहरी प्रवासासाठी ही स्कूटर एक स्मार्ट आणि पर्यावरणपूरक पर्याय ठरणार आहे. जगदंबा मोटर्स प्रा. लि. यांच्या सहकार्याने ही स्कूटर नेपाळमधील ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार असून, या लाँचिंगमुळे कंपनीच्या ईव्ही पोर्टफोलिओमध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण भर पडली आहे.
वैशिष्ट्ये, तांत्रिक क्षमता–१५८ किमी रेंज
टीव्हीएस ऑर्बिटर मध्ये ३.१ kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून, ही स्कूटर एका चार्जमध्ये तब्बल १५८ किमीची आयडीसी (IDC) रेंज देते असा कंपनीचा दावा आहे. दैनंदिन प्रवासात ग्राहकांना जास्तीत जास्त आराम मिळावा म्हणून यामध्ये क्रूझ कंट्रोल, हिल होल्ड असिस्ट, पार्किंग असिस्ट आणि ३४ लिटरची प्रशस्त बूट स्पेस (डिकी) देण्यात आली आहे, ज्यामध्ये सहजपणे दोन हेल्मेट सामावू शकतात. याशिवाय, उद्योगात प्रथमच यामध्ये १४ इंचाचे फ्रंट व्हील
(पुढील चाक) वापरण्यात आले आहे, ज्यामुळे रस्त्यावरील स्थिरता आणि रायडिंगचा आराम वाढतो. तसेच १६९ मिमी ग्राउंड क्लिअरन्स, ८४५ मिमी लांब फ्लॅटफॉर्म सीट आणि २९० मिमी सरळ फूटबोर्डमुळे रायडर आणि पिलियन दोघांनाही उत्तम ड्रायव्हिंग पोश्चर आणि लेगूम मिळते.
तंत्रज्ञान, कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षा
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत या स्कूटरमध्ये कनेक्टेड मोबाईल ॲप, इनकमिंग कॉल डिस्प्लेसह कलर एलसीडी डिजिटल क्लस्टर, आणि एलईडी हेडॅम्पसह व्हिझर देण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने यामध्ये क्रॅश आणि फॉल अलर्ट, अँटी-थॅफ्ट, जिओ-फेन्सिंग, टाईम-फेन्सिंग अलर्ट्स, इकॉन आणि पॉवर हे दोन रायडिंग मोड तसेच रीजेनेरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम समाविष्ट करण्यात आली आहे. नेपाळच्या विविध प्रकारच्या भूप्रदेशावर आणि रस्त्यांच्या परिस्थितीवर या स्कूटरची कठोर चाचणी घेण्यात आली असून, ही स्कूटर निऑन सनबस्ट, कॉस्मिक टिटेनियम आणि मार्टियन कॉपर या ३ आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. टीव्हीएस आयक्यूबच्या यशानंतर ऑर्बिटरच्या आगमनाने नेपाळमधील इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात कंपनीचे स्थान अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.







