Home » अर्थ-बॅंकिंग » छोट्या नागरी सहकारी बँकांना आधुनिक बँकिंग तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी Bank in a Box सेवा

छोट्या नागरी सहकारी बँकांना आधुनिक बँकिंग तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी Bank in a Box सेवा

Bank in box
Facebook
Twitter
WhatsApp
देशातील छोट्या नागरी सहकारी बँकांना आधुनिक बँकिंग तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी NUCFDCने ‘Bank in a Box’ ही एकत्रित सेवा सुरू केली आहे. Core Bankingपासून Digital Payments, Cloud Infrastructure आणि Regulatory Complianceपर्यंतच्या महत्त्वाच्या सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर मिळणार असल्याने अगदी एका शाखेच्या बँकेलाही मोठी तांत्रिक गुंतवणूक न करता आधुनिक बँकिंग सेवा देता येणार आहेत.

नागरी सहकारी बँकांसाठी तंत्रज्ञानाचा खर्च आणि सायबर सुरक्षेची जबाबदारी ही गेल्या काही वर्षांत मोठी आव्हाने बनली आहेत. मोठ्या बँकांप्रमाणे स्वतंत्र तंत्रज्ञान व्यवस्था उभारण्यासाठी छोट्या सहकारी बँकांकडे पुरेसे आर्थिक आणि तांत्रिक संसाधन नसतात.

याच पार्श्वभूमीवर National Urban Cooperative Finance and Development Corporation अर्थात NUCFDCने ‘Bank in a Box’ ही संकल्पना पुढे आणली आहे.

या व्यवस्थेचा मुख्य उद्देश असा आहे की, प्रत्येक नागरी सहकारी बँकेने स्वतंत्रपणे महागडी तंत्रज्ञान प्रणाली उभारण्याऐवजी सामायिक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आवश्यक डिजिटल सुविधा मिळवाव्यात.

‘Bank in a Box’मध्ये नेमके काय मिळणार?

‘Bank in a Box’ हा एखादा भौतिक बॉक्स नसून नागरी सहकारी बँकांसाठी तयार करण्यात आलेला एक Integrated Banking Technology Platform आहे.

यामध्ये बँकेच्या दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असलेल्या अनेक तंत्रज्ञान सुविधा एकत्रित करण्यात आल्या आहेत.

यात प्रामुख्याने Core Banking, Digital Payments, Cloud Services आणि Regulatory Compliance यांचा समावेश आहे.

म्हणजेच ग्राहकांचे खाते व्यवस्थापन, बँकिंग व्यवहार, डिजिटल पेमेंट सुविधा, डेटा व्यवस्थापन आणि नियामक नियमांचे पालन करण्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाची व्यवस्था एकाच फ्रेमवर्कमध्ये उपलब्ध होऊ शकते.

एका शाखेच्या बँकेलाही आधुनिक बँकिंग

या उपक्रमाचा सर्वात मोठा फायदा छोट्या नागरी सहकारी बँकांना होऊ शकतो.

समजा एखाद्या UCBकडे फक्त एक शाखा आहे. अशा बँकेला स्वतःचे Core Banking System, Cloud Infrastructure, Digital Payment Infrastructure आणि Cyber Security व्यवस्था उभारण्यासाठी मोठी गुंतवणूक करणे कठीण असते.

‘Bank in a Box’मुळे अशा बँकेला स्वतंत्रपणे प्रत्येक प्रणाली खरेदी आणि देखभाल करण्याची गरज कमी होऊ शकते.

ALSO READ:  Paytm Payments Bank बंद होणार; आरबीआयच्या कारवाईनंतर अधिकृत लिक्विडेटर नियुक्त
Bank in box

यामुळे छोट्या बँकांनाही मोठ्या बँकांप्रमाणे डिजिटल सुविधा देण्याची क्षमता मिळू शकते.

सामूहिक खरेदीमुळे तंत्रज्ञानाचा खर्च कमी

NUCFDCच्या Umbrella Organisation मॉडेलचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे सामूहिक पद्धतीने तंत्रज्ञान सेवा उपलब्ध करून देणे.

सध्या प्रत्येक बँकेने स्वतंत्रपणे सॉफ्टवेअर, सुरक्षा प्रणाली आणि तंत्रज्ञान सेवा घेतल्यास त्याचा खर्च मोठा होऊ शकतो.

NUCFDC अनेक बँकांसाठी एकत्रित करार करू शकते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान सेवा घेता येतील आणि त्याचा फायदा तुलनेने कमी खर्चाच्या स्वरूपात सदस्य बँकांना मिळू शकतो.

याचा विशेष फायदा लहान आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना सेवा देणाऱ्या नागरी सहकारी बँकांना होण्याची शक्यता आहे.

पुढे AI आणि Fraud Preventionचाही वापर

‘Bank in a Box’ ही केवळ Core Banking व्यवस्था नसून त्याच्या व्यापक चौकटीत अनेक आधुनिक सुविधा विकसित केल्या जात आहेत.

यामध्ये AI आधारित Fraud Prevention, Shared Payment Services, Loan Origination System, Sahkar Cloud आणि Automated Regulatory Compliance यांचा समावेश आहे.

संशयास्पद व्यवहार आणि संभाव्य Mule Accounts शोधण्यासाठी ‘MuleHunter’सारख्या आधुनिक सॉफ्टवेअरचा वापर करण्याची सुविधाही NUCFDCच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकते.

यामुळे डिजिटल व्यवहार वाढत असताना फसवणूक ओळखण्याची आणि त्यावर वेळीच नियंत्रण ठेवण्याची क्षमता UCBना मिळू शकते.

Cyber Securityकडेही विशेष लक्ष

डिजिटल बँकिंग वाढले की सायबर सुरक्षेची जबाबदारीही वाढते. छोट्या बँकांसाठी स्वतंत्र Security Operations Centre उभारणे आर्थिकदृष्ट्या अवघड असू शकते.

म्हणूनच NUCFDCने Urban Cooperative Banksसाठी Security Operations Centre सुरू केले आहे.

या केंद्रातून सहभागी बँकांना चोवीस तास सायबर मॉनिटरिंग आणि सुरक्षा सहाय्य मिळणार आहे.

NUCFDCने National Forensic Sciences Universityसोबत केलेल्या सामंजस्य करारामुळे डिजिटल फॉरेन्सिक, सायबर सुरक्षा प्रशिक्षण आणि संशोधनाची सुविधाही UCB क्षेत्राला उपलब्ध होणार आहे.

Gold and Silver price

टॉप स्टोरी

नक्की वाचा