Home » शेअर बाजार » HCLTech आणि Sarvam चा मेगा प्रकल्प: ओड़िसात ₹१४,२५७ कोटींच्या गुंतवणुकीसह देशातील पहिल्या AI डेटा सेंटरची घोषणा

HCLTech आणि Sarvam चा मेगा प्रकल्प: ओड़िसात ₹१४,२५७ कोटींच्या गुंतवणुकीसह देशातील पहिल्या AI डेटा सेंटरची घोषणा

Facebook
Twitter
WhatsApp

जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असणाऱ्या एचसीएल टेकने (HCLTech) २४ जुलै २०२६ रोजी स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, ओड़िसातील आगामी ‘सोव्हरेन एआय पार्क’मध्ये (Odisha Sovereign AI Park) देशातील पहिले अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) डेटा सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा महात्वाकांक्षी प्रकल्प ‘सर्वम’ (Sarvam) आणि ओड़िसा सरकार यांच्या धोरणात्मक भागीदारीतून साकारला जात असून, याद्वारे भारताच्या तंत्रज्ञान आणि डिजिटल इकोसिस्टमला एक नवी दिशा मिळणार आहे.

₹१४,२५७ कोटींची गुंतवणूक आणि देशांतर्गत AI इकोसिस्टमची उभारणी

या संपूर्ण प्रकल्पासाठी एकूण ₹१४,२५७ कोटींची भरीव गुंतवणूक केली जाणार असून, यात ओड़िसा सरकारच्या आर्थिक सहाय्याचाही समावेश आहे. या धोरणात्मक गुंतवणुकीमुळे भारताच्या सार्वभौम कृत्रिम बुद्धिमत्ता (Sovereign AI) क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. एचसीएल टेकची फुल-स्टॅक AI क्षमता आणि ‘सर्वम’चे

ALSO READ:  RBI चा दुहेरी दणका; IndusInd Bank वर ₹59.20 लाख, Muthoot MCred वरही कारवाई

फाउंडेशन मॉडेल्स यांच्या संयुक्त विद्योगाने सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योगांसाठी विशेष क्षेत्रनिहाय (Sector-specific) AI ॲप्लिकेशन्स विकसित केले जातील. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वसमावेशक AI’ (AI for everyone) संकल्पनेनुसार तळागाळातील लोकांपर्यंत बहुभाषिक (Multilingual) AI सेवा पोहोचवण्याच्या दिशेने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

भव्य सामंजस्य करार

या प्रकल्पाचा अधिकृत सामंजस्य करार (MoU) ओड़िसाचे मुख्यमंत्री मोहन चरण माथी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या सोहळ्याला ओड़िसाचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री डॉ. मुकेश महालिंग, HCLTech च्या अध्यक्षा रोशनी नाडर मल्होत्रा, CEO व MD सी. विजयकुमार आणि Sarvam चे सह-संस्थापक प्रत्युष कुमार उपस्थित होते. रोशनी नाडर मल्होत्रा यांच्या मते, डिजिटल इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनेशी सुसंगत राहून देशातील सोव्हरेन AI इकोसिस्टमला बळकट करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. उच्च-कार्यक्षमता असलेल्या कंप्युटिंग पॉवरला भारतीय मॉडेल्सशी जोडण्याचे काम या ओड़िसा सोव्हरेन एआय पार्कद्वारे केले जाईल, ज्यामुळे भविष्यात तंत्रज्ञान क्षेत्रात नव्या रोजगाराच्या संधी आणि आर्थिक विकासाचे नवे मार्ग खुले होणार आहेत.

 

Gold and Silver price

टॉप स्टोरी

नक्की वाचा